S M L

नेपाळच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन मैत्री' !

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2015 02:56 PM IST

नेपाळच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन मैत्री' !

opraion maitri26 एप्रिल : नेपाळला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारा भारत हा पहिला देश ठरला. या मदत मोहिमेला भारतानं ऑपरेशन मैत्री असं नाव दिलंय.

लष्कराची 10 आयएएफ (IAF) विमानं वैद्यकीय आणि बचाव साहित्य घेऊन निघाली आहेत. तर शनिवारपासूनच एनडीआरफची काही पथकं नेपाळमध्ये बचाव कामाला लागलीयेत. एअर इंडियोसबतच स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सनंही काठमांडूसाठी अतिरिक्त सेवा सुरू केलीये.

एअर इंडियाच्या विमानांमधून बचाव कार्यासाठीचं साहित्य नेण्याला प्राधान्य दिलं जातंय. तसंच भारतीय रेल्वेही या मदतकार्यात सहभागी झालीये. रेल्वेमार्फत 1 लाख पाण्याच्या बाटल्या नेपाळला पाठवण्यात आल्या आहेत. तर एअरटेल आणि BSNLने नेपाळसाठीच्या सर्व फोन कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलीये.

नेपाळला संकटातून बाहेर काढण्यासाठी

भारतानं नेपाळसाठी मदत पथकं पाठवली

- सुटकेसाठी हवाई दलाची 8 मिग 7 हेलिकॉप्टर्स

- त्याशिवाय 2 एएलएच ध्रुवसह आणखी 4 विमानं पाठवण्यात येणार आहेत

- पाणी, अन्न, एनडीआरएफची पथकं, वैद्यकीय पथकं,ब्लँकेट्स आणि तंबू पाठवण्यात आलीयेत.

- हॉस्पिटल्स आणि अभियांत्रिकी कामांसाठी लष्कराला घेऊन जाणारी 10 विमानं पाठवली जाणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2015 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close