S M L

एव्हरेस्टवर 65 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती, गुगलच्या कर्मचार्‍याच्या मृत्यू

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2015 05:15 PM IST

एव्हरेस्टवर 65 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती, गुगलच्या कर्मचार्‍याच्या मृत्यू

26 एप्रिल : नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखरही हादरलाय. एव्हरेस्टवर मोठ्या प्रमाणात जीवघेणा हिमकडा कोसळला. त्यामध्ये 65 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यामध्ये गुगलच्या डॅन फ्रेडिन्बर्ग या कार्यकारी अधिकार्‍याचाही समावेश आहे. तसंच बेस कँपवर आणखी एक हजार जण अडकल्याची भीती आहे. गिर्यारोहकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत.

शनिवारी भूकंपामुळे हिमकडा कोसळल्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाला. हिमकडा कोसळल्यामुळे दोन महत्वाचे बेसकॅम्प वाहून गेले आहे. यात अठरा जणांमध्ये गुगलचे तीन अधिकारी सामिल होते. गुगलचे अधिकारी लॉरेंस यू यांनी एक ब्लॉग प्रसिद्ध केलाय. या ब्लॉगमध्ये डॅन फ्रेडिन्बर्ग यांच्यासही तीन अधिकारी एव्हेरस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते. मात्र,डॅन फ्रेडिन्बर्ग यांचा मृत्यू झाला तर इतर तीन अधिकारी सुखरूप वाचले. त्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. डॅन फ्रेडिन्बर्ग यांच्या मृत्यू बद्दल गुगलने दुख व्यक्त केलंय. गुगलने नेपाळला मदतीसाठी 10 लाख डॉलरची मदतही जाहीर केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2015 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close