S M L

मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 6 लाखांची मदत

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2015 09:57 PM IST

nepalEarthquake_2ndday (9)26 एप्रिल : नेपाळमध्ये भूकंपाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेण्यात आली. मदतकार्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधानांनी मदतकार्याचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहे. तसंच केंद्राकडून भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 6 लाखांची मदत जाहीर केलीये.

नेपाळमध्ये मदतीसाठी एनडीआरएफच्या आणखी 6 टीम्स पाठवण्यात येणार आहे. आज सैन्याची 13 विमानं नेपाळला रवाना झालीये. त्यांच्यासोबत मेडिकल, इंजिनिअर्सची टीम काठमांडूला गेले आहेत अशी माहिती जयशंकर यांनी दिली. नेपाळमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. भारतीय पर्यटकांना बसव्दारेही परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधानांच्या निवास्थानी पार पडलेल्या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह इतर महत्वाचे मंत्री आणि ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2015 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close