S M L

उत्तरभारतात भूकंपामुळे 69 लोकांचा मृत्यू, 259 जखमी

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2015 12:07 PM IST

उत्तरभारतात भूकंपामुळे 69 लोकांचा मृत्यू, 259 जखमी

27 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाभूकंपाचा धक्का भारतालाही बसला. उत्तर भारतात झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 69 लोकांचा मृत्यू झालाय. तर 259 जण जखमी आहेत. यात बिहारमध्ये सर्वात जास्त म्हणजे 50 जणांचा बळी गेलाय. तर उत्तर प्रदेशात 14 जणांचा मृत्यू झाला. या भूकंपात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना आता 6 लाखांची मदत देण्यात येणार आहे.

शनिवारी नेपाळमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंपाचा हादरा बसला. 7.8 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के दिल्लीसह उत्तर भारतालाही जानवले. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आणि राजस्थानलाही भूकंपाचे हादरे बसले. उत्तरप्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2015 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close