S M L

केंद्र सरकारने 9 हजार एनजीओंचे परवाने केले रद्द

Samruddha Bhambure | Updated On: Apr 28, 2015 02:09 PM IST

केंद्र सरकारने 9 हजार एनजीओंचे परवाने केले रद्द

28 एप्रिल : केंद्र सरकारनं आज (मंगळवारी) देशभरातील जवळपास 9 एनजीओंचा परवाना रद्द केला आहे. टॅक्स रिटर्न न भरल्यानं तसचं परदेशी गुंतवणूक नियमन कायद्यानुसार (एफसीआरए) नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

भाजप सरकार आल्यापासून अनेक संस्था विशेष म्हणजे विदेशी एनजीओ गृहमंत्रालयाच्या रडावर होत्या. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने सरकारने औष्णिक आणि विद्युत प्रकल्पाला विरोध करणार्‍या 'ग्रीनपीस' संघटनेच्या लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक वर्ष 2009-10, 2010-11 आणि 2011-12 मध्ये टॅक्स रिटर्न न भरल्यामुळे केंद्र सरकारने 10,343 स्वयंसेवी संस्थांना नोटीस बजावली होती.

नोटिसीमध्ये या संस्थांना परदेशातून किती निधी मिळाला, याचा उल्लेख करून वरील तीन वर्षांसाठीचे टॅक्स रिटर्न एक महिन्याच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. कोणत्या कारणांसाठी परदेशातून निधी गोळा करण्यात आला, याचीही माहिती देण्याचे या नोटिसीत म्हटलं होतं. पण, नोटीस बजावण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांपैकी 229 संस्थांनीच त्यांचे प्राप्तिकर रिटर्न्स भरले. उरलेल्या संस्थांनी काहीच उत्तर न दिल्यामुळेच त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2015 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close