S M L

हे सरकार तुमचं आमचं पण, शेतकर्‍यांचं नाही -राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2015 06:58 PM IST

rahul gandhi in lc29 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा लोकसभेत शेतकर्‍यांचा मुद्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं. अवकाळी पावसादरम्यान तुमच्या सरकारनं शेतकर्‍यांसाठी काय केलं असा खडा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हे सरकार तुमचं-आमचं आहे, पण शेतकर्‍यांचं नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

पंजाब दौर्‍यावरून परतलेले राहुल गांधी यांनी आज लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळे सभागृहात एकच कल्लोळ उडाला. पंतप्रधान सध्या भारत दौर्‍यावर आहेत, त्यांनी एकदा पंजाबला जाऊन शेतकर्‍यांची परिस्थिती पाहावी, असा टोमणा राहुल यांनी मारला. ते सारखं तुमचं सरकार, तुमचं सरकार म्हणत होते. त्यावरून अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं, की तुम्ही माझ्याकरवी प्रश्न विचारताय, हे सरकार, असं म्हणा. त्यावरून हशा उमटली, आणि राहुल यांनीही आपली चूक मान्य केली. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी सरकारकडे मोर्चा वळवलाय. अवकाळी पावसाच्या वेळी सरकारने मदत का केली नाही असा प्रश्न राहुल यांनी विचारला. तसंच पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया मोहिमेवरही राहुल यांनी टीका केली. जो शेतकरी शेतात गहू पेरतो तो मेक इन इंडिया देत नाही का?, असा टोलाही लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2015 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close