S M L

छेडछाडीला विरोध करणार्‍या माय-लेकीला बसमधून फेकलं, मुलीचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 30, 2015 04:07 PM IST

molestation pimpri Girl

30 एप्रिल : पंजाबच्या मोगा परिसरात छेडछाडीला विरोध करणार्‍या माय-लेकीला बसमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुदैर्वी घटनेत 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ज्या बसमध्ये ही घटना घडली ती ऑर्बिट एव्हिएशन कंपनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मालकीची आहे.

पीडित महिला ही आपला मुलगा आणि मुलीसोबत गुरुद्वारात जाण्यासाठी बसमधून प्रवास करत होती. बस बाघापुरान्याच्या दिशेने जात असताना बसमधील दोन प्रवाशांनी पीडित महिला आणि तिच्या मुलीशी छेडछाडीचा प्रयत्न केला. धक्कादायक प्रकार म्हणजे महिला छेडछाडीला विरोध करायला लागल्यानंतर बसच्या चालक आणि कंडक्टरनेही या महिला आणि मुलीसोबत छेडछाडीचा प्रयत्न केला.

या छेडछाडीला विरोधा होताच बसचा चालक आणि कंडक्टरने पीडित महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना बसमधून ढकलून दिलं, यात 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर महिलेला मोगा इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. तर बस मुख्यमंत्र्याच्या मालकीची असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण मीडियाचा दबाव येताच पोलिसांना कारवाई करावी लागली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2015 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close