S M L

1993 बॉम्बस्फोट प्रकरणी दाऊदला शरण यायचं होतं पण...

Sachin Salve | Updated On: May 2, 2015 03:11 PM IST

Dawood Ibrahim12302 मे :भारताचा मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेनं जंगजंग पछाडलं पण दाऊद काही हाती आला नाही. आता मात्र, खुद्द दाऊदचं 1993 च्या बॉम्बस्फोटांनतर शरण येण्यासाठी तयार होता असा गौप्यस्फोट सीबीआयचे तत्कालीन डीआयजी नीरज कुमार यांनी केला आहे. बॉबस्फोटांनंतर 15 महिन्यांनी दाऊदला शरण यायचं होतं त्यासंदर्भात त्याचं सीबीआयशी बोलणं झालं होतं. मात्र, सीबआयनं त्यांचा प्रस्ताव नाकारला असा गौप्यस्फोट नीरज कुमार यांनी त्यांच्या आगामी पुस्तकात केलाय. नीरज कुमार यांच्या वरिष्ठांनी ही चर्चा मध्येच थांबवली असंही नीरज कुमार यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम मुख्य आरोपी आहे. या साखळी स्फोटात 257 लोक ठार तर 700 जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटानंतर दाऊदने भारतातून पलायन केलं. 1993 ते 2002 या काळात नीरज कुमार सीबीआयमध्ये कार्यरत होते. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नीरज कुमार यांनी खळबळजनक खुलासा केलाय. जून 1994 मध्ये दाऊदला शरण यायचं होतं. त्याबद्दल त्याच्याशी तीन वेळा आपलं बोलणं झालं होतं. दाऊद सगळ्या आरोपांना उत्तरं देण्यासाठीही तयार होता. पण, आपण आत्मसमर्पण केल्यावर भारतीतील त्याचे शत्रू त्याची हत्या करतील अशी भीती त्याला होती. नीरजकुमार यांनी दाऊदच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेईल असं आश्वासन दिलं होतं. पण, ही चर्चा पुढे सुरू राहणार त्याअगोदरच वरिष्ठ अधिकार्‍यांनी खोडा घातला आणि चर्चा थांबली.

मनीष लाला म्हणून झाली चर्चा

दाऊद आणि नीरजकुमार यांची चर्चा मनीष लालाने घडवून आणली होती. मनीष लाला हा दाऊदच्या सर्व कायदेशीर बाबी सांभाळत होता. विशेष म्हणजे, लालाकडे कोणतीही वकिली करण्याची डिग्री नव्हती. फक्त त्याला त्याबद्दल माहिती होती. नीरजकुमार लालाला मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये भेटले होते. 4 जून 1998 मध्ये दाऊदचा कट्टर शत्रू छोटा राजनच्या गुंडांनी लालाची हत्या केली होती. नीरजकुमार यांनी जुलै 2013 मध्ये दिल्ली पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाले होते. नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली 1993 बॉम्बस्फोटांचा तपास झाला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2015 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close