S M L

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बहुमताकडे वाटचाल

22 ऑक्टोबरपुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीनं राज्यात सत्तेची हायट्रीक साधली आहे. 288 पैकी 145 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. तर 87 जागांवर सेना-भाजप युतीचा जोर आहे. मनसे 14 जागांवर, तिसरी आघाडी 10 जागांवर तर इतर पक्ष आणि अपक्ष 28 जागांवर पुढे आहेत. ठाण्यात शिवसेनेन आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवलं असलं, तरी मुंबईत मात्र मनसे फॅक्टरचा शिवसेनेला पुन्हा एकदा फटका बसलाय. मुंबईतल्या जवळपास 3 जागांवर मनसेने शिवसेना उमेदवाराला पिछाडीवर टाकलंय. यातल्या 2 जागांवर मनसेने विजय मिळवलाय.घाटकोपर पश्चिममध्ये भाजपच्या पूनम महाजन यांचा पराभव झालाय. त्यांना मनसेचे राम कदम यांनी पराभूत केलय. विक्रोळीतून शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा मनसे उमेदवार मंगेश सांगळे यांनी पराभव करत विधानसभेतली आपली पहिली जागा पटकावलीय. तर, सेनेचा गड मानल्या जाणा-या शिवडी मतदारसंघातही मनसेच्या बाळा नांदगावकरांनी 2 वेळा आमदार असलेल्या सेनेच्या दगडू सकपाळांना पराभवाचा धक्का दिलाय. आणि बहुचर्चित माहिम मतदारसंघात मनसेच्या नितीन सरदेसाईंनी विजय मिळवलाय. इथे सेनेचे आदेश बांदेकर आणि काँग्रेसचे सदा सरवणकर यांचा त्यांनी पराभव केला. शिवसेनेला काही ठिकाणी धक्का बसला असला, तरी काही ठिकाणी सेनेनं अपेक्षित विजय मिळवलाय. जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर जवळपास 15हजार मतांनी जिंकलेत. ठाण्यात राजन विचारे आणि ओवळी-माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांनी सेनेचा गड राखण्यात यश मिळवलंय. महत्वाचे निकाल - गुहागरमधून शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांचा धक्कादायक पराभव झालाय.राष्ट्रवादीचे भास्कर जाधव हे गुहागरमधून विजयी झाले आहेत.भाजपचे विनय नातू यांच्या बंडखोरीचा फटका रामदास कदम यांना बसलाय.अमरावीत रावसाहेब शेखावतांचा विजय : घराणेशाहीविरुद्धच्या लढ्यात सुनील देशमुख हरलेपद्मसिंह पाटलांचा मुलगा राणाजगजित सिंह यांचा पराभव : उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी मारली बाजीथेट शिवसेना भवनाच्या प्रांगणातच मनसेचा सेनेला दणका : माहीममध्ये आदेश भावोजींचा पराभव करत नितीन सरदेसाई विजयीगोरेगाव पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी बाजी मारलीय. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शरद राव आणि मनसेच्या उदय माशेलकर यांचा त्यांनी पराभव केला. विजयाची हॅटट्रीक केलेल्या सुभाष देसाई यांनी आपल्या विजयावर समाधान व्यक्त केलंय. घाटकोपर मतदारसंघातून पूनम महाजनचा पराभव : मनसेच्या राम कदमांची झाली सरशीमुंबईबरोबर मनसेनं नाशिकमध्येही बाजी मारलीय.. नाशिकमध्ये मनसेचे उमेदवार वसंत गिते यांनी दणदणीत विजय मिळलाय. राज ठाकरे यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचं हे फळ असल्याचं गिते यांनी म्हटलंय. त्याचबरोबर 2014मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मनसेचा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चिमुर मध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे वसंत वारजुरकर उभे होते. मतमोजणीच्या पहील्या फेरीपासुनच वडेट्टीवार आघाडीवर होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांनी विजय मिळवलाय. सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत.औरंगाबाद पूर्वमधून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा विजयी झालेत.त्यांच्याशी बातचीत केलीये.प्रचारादरम्यान खून प्रकरणानं गाजलेल्या अक्कलकोट मतदारसंघात राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सिद्धराम म्हेत्रे यांचा पराभव झालाय. भाजपचे उमेदवार सिद्रामप्पा पाटील यांनी त्यांचा 2500 मतांनी पराभव केलाय. श्रीगोंदा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढाईत अखेर वनमंत्री बबनराव पाचपुते भाजपच्या राजेंद्र नागवडेंंवर मात करत विजयी झाले. इथली लढत गोपिनाथ मुंडेंनी प्रतिष्ठेची केली होती. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांनीही बंडखोरी केली होती. तरीही सातव्यांदा निवडणूक लढताना वनमंत्री बबनराव पाचपुतेंनी हा विजय मिळवलाय. पाचपुतेंनी 27000 हजाराने आघाडी घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2009 11:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2009 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close