S M L

कौन बनेगा मुख्यमंत्री ?

पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीनं राज्यात सत्तेची हायट्रीक साधलीये. काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार हेही आता निश्चित झालंय, पण मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाच दावा आताप्रबळ मानला जातोय. पण विलासराव देशमुख त्यांना विरोध करण्याची शक्यता आहे. पण कौन बनेगा मुख्यमंत्रीहाच आता सगळ्यात मोठा सस्पेन्स ठरलाय.आघाडीनं 140 चा पल्ला पार केला आणि अशोक चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यासमोर जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काही वेळातच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे वर्षावर अभिनंदन करायला आले, आणि अशोकरावांचं कौतुक करुन त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीला पाठिंबा दिलाय.अशोक चव्हाणांना बदलण्याचं कुठलंही प्रबळ कारण नसलं तरी एक गोष्ट मात्र त्यांच्या विरोधात जात आहे, ती म्हणजे विलासरावांचा विरोध. सर्वात जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले आणि दिल्लीमध्ये सर्वात जोरदार वजन असलेले विलासराव स्वत: दावेदारी सादर करतात की दुसर्‍या कुणाला पाठिंबा देतात यावर बरंच काही अवलंबून आहे.शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून माघार घेतलीये. पण अशोक चव्हाण, नारायण राणे आणि पतंगराव कदमया नेत्यांनी दिल्लीत येऊन लॉबिंग केलीये. त्यात आता विलासराव आता काय चाल चालतात याकडे सगळ्यांचंलक्ष आहे. कौन बनेगा मुख्यमंत्री या प्रश्नाचं उत्तर मिळायला अजून काही थांबावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2009 03:21 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2009 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close