S M L

'आप' नेते कुमार विश्वास यांना महिला आयोगाची नोटीस

Samruddha Bhambure | Updated On: May 4, 2015 05:04 PM IST

'आप' नेते कुमार विश्वास यांना महिला आयोगाची नोटीस

04 मे : पक्षांतर्गत कलह, रॅलीत शेतकर्‍याने केलेली आत्महत्या यांसारखी वादळं शांत होत नाहीत तोच आम आदमी पक्ष आता कुमार विश्वास यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. आपचे नेते डॉ. कुमार विश्वास यांच्याविरोधात पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने तक्रार केल्यानंतर दिल्लीच्या महिला आयोगाने विश्वास यांना समन्स बजावले आहे. विश्वास यांना मंगळवारी महिला आयोगासमोर हजर राहून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मला बदनाम करण्याचा हा कट आहे असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे.

आपच्या महिला कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. कुमार विश्वास आणि आपले अवैध संबंध असल्याची अफवा कुमार विश्वास पसरवत आहेत. यामुळे आपली बदनामी होत असून माझं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. आता कुमार विश्वास यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी असं या महिलेचं म्हणणं होते. या महिलेच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे.

याप्रकरणी महिला आयोगाने कुमार विश्वास आणि त्यांच्या पत्नीला समन्स बजावत मंगळवारी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठीतील आपच्या महिला कार्यकर्त्याचे कुमार विश्वास यांनी शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. पण संबंधीत महिलेनेच या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुमार विश्वास यांनी या प्रकरणासाठी भाजपाला जबाबदार ठरवल असून मला बदनाम करण्यासाठी काही लोकं घाणेरडे राजकारण करत आहेत असे विश्वास यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2015 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close