S M L

दाऊद कुठे आहे माहीत नाही, मोदी सरकारने केले हातवर

Sachin Salve | Updated On: May 5, 2015 03:42 PM IST

Dawood Ibrahim12305 मे : 1993 साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल मोदी सरकारने सपेशल हातवर केले आहे. दाऊद कुठे आहे ते माहीत नाही, असं केंद्र सरकारनं संसदेत स्पष्ट करून टाकलंय. एवढंच नाहीतर गुप्तचर संस्थांना दाऊदची माहिती नाही, नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सांगितलंय. दाऊद कुठे आहे ते समजल्यावरच त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 लोकांचा बळी घेणार्‍या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी आतापर्यंतच्या सरकारने अनेक प्रयत्न केले किंवा दावा केला पण अजूनही डॉन भारताच्या ताब्यात आला नाही. त्यातच मागील आठवड्यात सीबीआयचे तत्कालीन डीआयजी नीरजकुमार यांनी दाऊद इब्राहिमला शरण यायचं होतं असा गौप्यस्फोट केला होता. एवढंच नाहीतर दाऊद शरण येणार होता पण, वरिष्ठ अधिकार्‍यांनी आडकाठी आणून दाऊदशी चर्चा थांबवली असा खुलासाही त्यांनी केला. आपल्या विधानावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर नीरजकुमार यांनी यू-टर्न घेतला.

पण, या निमित्ताने दाऊद भारताच्या ताब्यात कधी येणार ?, या चर्चेला ऊत आलाय. आज संसदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी या प्रकरणी माहिती दिली असता सपेशल सरकारने हातच वर केले आहे. दाऊद कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही. गुप्तचर संस्थांच्या रडारवरही दाऊद नाही. दाऊद कुठे आहे जेव्हा कळेल तेव्हा त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करू असं स्पष्टीकरणच चौधरी यांनी दिलं.

विशेष म्हणजे यूपीए सरकारने दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचा दावा केला होता. दाऊदचा कराचीमधील क्लिफ्टन रोड येथील ठावठिकाणाही सरकारने दिला होता. तसंच दाऊदला लवकरच भारतात आणणार असा दावा तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. पण, आता दाऊद गेला कुणीकडे असा प्रश्न मोदी सरकारने उपस्थित केला.

दरम्यान, आतापर्यंत एकाही सरकारला दाऊदला आणणं शक्य झालेलं नाही. हिंमत असेल तर सरकारनं अमेरिकेनं जसं लादेनला पकडलं तसं दाऊदला पकडा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2015 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close