S M L

काँग्रेसचा जीएसटी विधेयकाला पाठिंबा, भाजपने मानले आभार

Sachin Salve | Updated On: May 5, 2015 05:26 PM IST

sonia_vs_modi05 मे : भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारविरोधात रण पेटवणार्‍या काँग्रेसने जीएसटी विधेयकाला पाठिंबा दिलाय. आज (मंगळवारी) लोकसभेत जीएसटी विधेयकावर चर्चेला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईलींनी पाठिंबा देण्याची घोषणा केली.

मी, GST विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे असं म्हणत मोईलींनी विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. त्यावर अर्थमंत्री अरूण जेटलींनी काँग्रेसचे लगेच आभार मानले.

काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे जीएसटी विधेयकाच्या मार्गातला अडथळा दूर झालाय. या विधेकाला मंजुरी मिळाल्यास देशात लावण्यात येणारे सर्व कर रद्द होऊन फक्त वस्तू आणि सेवा कर या नावाचा एकच कर लागू करण्यात येणार आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2015 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close