S M L

तिसर्‍या आघाडीची दमदार सुरवात

22 ऑक्टोबर ेऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात तिसर्‍या आघाडीची स्थापना झाली. आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला धडकी भरली. निवडणुकीत या आघाडीला फारशा जागा मिळाल्या नसल्या तरी तिसर्‍या आघाडीनं राज्याच्या राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केलीय. प्रस्थापित पक्षांना धक्का द्यायच्या इराद्यानं राज्यात 17हून अधिक पक्षांची तिसरी आघाडी स्थापन झाली. या आघाडीच्या स्थापनेत पुढाकार घेतला रिपब्लिकन पक्षांनी. पण इथंही रिपब्लिकन पक्षांमधली फुटीची परंपरा कायम राहिली. पण एकजूट दाखवत आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली. त्यामुळं निकालाच्या दिवसापर्यंत तिसर्‍या आघाडीशी जुळवून घेण्याची भाषा सगळ्याच पक्षांना करावी लागली. आणि या आघाडीच्या पदरात 13 जागा पडल्या. तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांनी या विजयाबाबत समाधान व्यक्त केलंय. निवडणूकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. आमच्याकडं पैसे, वेळ कमी होता. त्यामुळे यश मिळालं नाही असं सागत रिपाईचे रामदास आठवले यांनी तिसरी आघाडी फुटू देणार नाही असं म्हटलं आहे.तिसर्‍या आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी पक्षाच्या राजू शेट्टींनी निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केल्याची चर्चा झाली. परिणामी लोकसभेच्या वेळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देणार्‍या राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळ मतदारसंघात धक्का बसलाय. शिरोळमधून काँग्रेसचे वयोवृद्ध उमेदवार सा. रे. पाटील निवडून आलेत. तिसरी आघाडीचे नेते राजू शेट्टी यांनी अपयशाचं विश्लेषण करताना शिरोळमध्ये मीरज दंगलीमुळं आमची हार झाली असं म्हटलं आहे. पण राज्यात आम्ही चांगली फाईट दिलीय. पण मतविभागणी झाल्यानं आम्हाला फारसा फायदा झाला नाही असंही ते म्हणाले. त्यात शेकापच्या अलिबागमध्ये मिनाक्षी पाटील, उरणमध्ये विवेक पाटील, सांगोल्यात गणपत देशमुख तर पेणमध्ये धैर्यशील पाटील विजयी झाले. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वमधले अबू आझमी भिवंडी पश्चिममधले रशीद ताहीर, शिवाजीनगरमध्येही अबू आझमी आणि नवापूरमध्ये शरद गावीत विजयी झाले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या भारत भालकेंनी पंढरपूरमधली जागा खेचून आणलीय. तर लातूरमधल्या अहमदपूरमध्ये राष्ट्रीय समाज पार्टी बाबासाहेब पाटील विजयी झालेत. डहाणूत माकपचे राजाराम ओझरे विजयी झालेत. तर माळशिरसमधले उत्तम जानकर आणि बडनेरामधले राणा रजपूत हे दोन अपक्ष उमेदवारही रिडालोसच्या पाठिंब्यावर निवडून आलेत. तिसर्‍या आघाडीचा एक फोर्स. भविष्यात ताकद वाढेल. पण रिपब्लिकननी आत्मपरिक्षण करण्याची गरज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तिसर्‍या आघाडीची गरज उरलेली नाही. पण असं असलं प्रस्थापितांना पर्याय म्हणून तिसर्‍या आघाडीनं स्वत:ची ओळख निर्माण केलीय हे मात्र नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2009 03:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2009 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close