S M L

सल्लूला दोषी ठरवायला 13 वर्षं पण, जामीन फक्त 3 तासांत कसा?

Sachin Salve | Updated On: May 7, 2015 04:48 PM IST

 Salman-Khan207 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी अंतरिम जामीन मिळालेल्या सलमान खानच्या अडचणीत आणखी वाढ झालीये. सलमानला दोषी ठरवायला 13 वर्षं आणि जामीन फक्त तीनच तासांमध्ये कसा ? असा आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीये. अखिलेश चौबे या वकिलांनी सलमानच्या जामिनाला आक्षेप घेतलाय. आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय.

फुटपाथ अपघात प्रकरणी सलमानला बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावलाय. मात्र, सकाळी सत्रन्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन तासांत सलमानने हायकोर्टात जामीन मिळवलाय. सलमानला घाईघाईत जामीन देण्यात आलाय. त्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी अखिलेश चौबे यांनी याचिकेत केलीयेो. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी म्हणजे उद्या शुक्रवारी सलमानचा अंतरिम जामीन संपतोय. मुंबई हायकोर्टाने काल सलमानला अंतरिम जामीन मंजूर केला होता. उद्या सलमानला निकालाची प्रत मिळण्याची शक्यता आहे. निकालाची प्रत मिळाली तर हायकोर्ट उद्या सलमानचा जामीन वाढवू शकतो. किंवा जामीन अर्ज फेटाळला तर सलमानला तुरुंगात जावं लागेल. आणि जर निकालाची प्रत मिळाली नाही तर सलमानच्या जामिनात वाढ होऊ शकते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2015 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close