S M L

अशोक चव्हाण : राज्याचे नवे मुख्यमंत्री

अशोक चव्हाण सलग दुस-यांदा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. दहा जनपथवर सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांनी केलेल्या जोरदार लॉबींगचा अडथळा दूर सारत अशोकरावांनी मुख्यमंत्रीपदाची खूर्ची पटकावली. अशोक शंकरराव चव्हाण यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून अखेर शिक्कामोर्तब झालं. शनिवारी मुंबईत झालेल्या विधीमंडळाच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची दिल्लीत सोनिया गांधींच्या घरी आणखी एक बैठक झाली. यात अशोकरावांचं नाव निश्चित करण्यात आलं आणि आयबीएन लोकमतनं 24 तास अगोदर दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नारायण राणे आणि विलासराव देशमुखांनांही दिल्लीत बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या समोरच अशोक चव्हाणांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित करण्यात आलं. आता अशोक चव्हाणांकडे काम करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी आहे. त्यात त्यांना वीज, दुष्काळ, महागाई, शेतक•यांच्या आत्महत्या, रस्त्यांची दूरावस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण क्षेत्रातला घोळ यांसारख्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागणार आहेच पण त्याच बरोबर राज्य विकासाच्या आघाडीवर नेण्यासाठीही जोरदार काम करावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2009 09:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2009 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close