S M L

या देशात गरिबांना न्याय मिळत नाही -सत्यपाल सिंग

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 03:44 PM IST

या देशात गरिबांना न्याय मिळत नाही -सत्यपाल सिंग

08 मे : या देशात गरीब, सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, श्रीमंत लोकांना पैशांच्या जोरावर शिक्षा टाळता येते हे अधोरेखित झालंय अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलीय. सलमान खानच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली त्यावर सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

अभिनेता सलमान खानला फुटपाथ अपघात प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टाने सलमानच्या 5 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिलीये. सलमानचे चाहत्ये एकीकडे जल्लोष करत आहे तर दुसरीकडे खेद व्यक्त करण्यात येतोय. मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले सत्यपाल सिंग यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीये. ते म्हणतात, या देशात अजूनही गरीब आणि सामान्यमाणसाला न्याय मिळत नाहीये. श्रीमंत लोकांना शिक्षा मिळणे मुश्किल झालंय. आपल्या देशातील जे वकिल आहेत त्यांनी एका प्रकारे कोर्टाचा निर्णय न मानण्याचा पायंडाच पाडलाय. कारण, कोर्टाने कोणताही निर्णय दिला तर तो मान्य करण्यास नकार देतात आणि आम्ही हायकोर्टात नाहीतर सुप्रीम कोर्टात जाऊ असं जाहीर आव्हान देतात. पण, तीन दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोर्टापुढे कुणी लहान मोठं नाही अशी आशा निर्माण झाली होता. पण, आता असं वाटतंय गरिबांना न्याय मिळू शकत नाही असं खेदाने म्हणावं लागतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close