S M L

केंद्राकडे अवकाळीचा प्राथमिक अहवाल, नुकसानभरपाईची मागणी नाहीच !

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 06:37 PM IST

avkali rain08 मे : महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल पाठवलाय मात्र, नेमकी किती नुकसान भरपाई ची आकडेवारीच दिली नसल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीये.

राज्यसभेत आज (शुक्रवारी) महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मुद्दा उपस्थित झाला. अवकाळीमुळे राज्यात पिकांचं किती नुकसान झालं आणि राज्य सरकारनं केंद्राकडे किती मदत मागितली, असा प्रश्न शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केला. याला उत्तर देताना 2 लाख 46 हजार 256 हेक्टर जमिनीवर विविध पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारनं पाठवलाय, असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलंय. पण, नेमकी आकडेवारी महाराष्ट्र सरकारनं दिलेली नाही, असं स्पष्टीकरणही राधामोहन सिंह यांनी दिलं. आता यावरून राजकारण सुरू होताना दिसतंय. सरकार मदत करणार नसेल तर आता शिवसेनेला जनआंदोलन करावं लागेल, असा इशारा सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close