S M L

उपमुख्यमंत्रिपदी छगन भुजबळ यांची निवड

26 ऑक्टोबरछगन भुजबळ यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यामुळे छगन भुजबळ यांना तिस-यांदा उपमुख्यमंत्री बनणार आहेत.या पदासाठी अजित पवार यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र अखेर भुजबळांनी बाजी मारली.भुजबळांची कारकिर्द :शिवसेनेत भुजबळ वाघ होते. 1985 मध्ये शिवसेनेचे एकटे आमदार असताना त्यांनी विधानसभा गाजवून सोडली होती. विरोधी पक्षनेतेपदावर हक्क असताना डावलंलं म्हणून भुजबळांनी 1991 मध्ये काँग्रेसचा रस्ता धरला. शिवसेना - भाजप सत्तेत असताना काँग्रेसचा विरोध जिवंत ठेवला तो भुजबळांनी. नंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून भुजबळ कायम चर्चेत राहिले. महत्वाकांक्षी भुजबळांना पवारांनी अलगद लगाम घातला. नाकापेक्षा मोती जड होऊ नये याची काळजी पवारांनी घेतली. तेलगी प्रकरणानंतर मागं पडत गेलेले भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्यात अडगळीत पडले. तेलगी प्रकरणानंतर पवारांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवलं होतं. भुजबळांच्या मनात यावरून दुरावा होता. 26/11 च्या हल्ल्यानंतर भुजबळ पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून आले. पण, भुजबळांची पक्षातली लढाई संपली नाही. भुजबळांचं प्रस्थ जाणिवपूर्वक पसरताना दिसत होतं. देशभर पाटणा, दिल्ली, जयपूर इथे लाखा लाखांच्या त्यांच्या सभांमुळे भुजबळांचा दरारा वाढला, तसेच शत्रूही वाढले. मराठ्यांचं वर्चस्व असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही भुजबळांचा दबदबा कायम राहिला. आणि अखेर पक्षनेतृत्वाला याची दखल घ्यावी लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2009 01:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2009 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close