S M L

विरोधात बोलाल तर खबरदार; केजरीवालांचा मीडियाविरोधात नवा फतवा

Samruddha Bhambure | Updated On: May 10, 2015 08:53 PM IST

विरोधात बोलाल तर खबरदार; केजरीवालांचा मीडियाविरोधात नवा फतवा

10  मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार पुन्हा वादात अडकलं आहे. आता केजरीवाल सरकारने थेट प्रसारमाध्यमांनाच लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री किंवा सरकारची प्रतिमा मलिन करणारं कुठलंही वृत्त आल्यास प्रधान सचिवांकडे तक्रार करा आणि संबंधित चॅनल किंवा पेपरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोका, असे आदेश दिल्ली सरकारने अधिकार्‍यांना दिले आहेत. मुख्यमंत्री केजरीवालांच्या या फतव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ज्या बातमीमुळे दिल्ली सरकारची किंवा मुख्यमंत्री केजरीवालांची प्रतिमा मलिन होत असेल तर त्या संबंधित बातमीची सचिव स्तरावर चौकशी करून याबाबतची माहिती दिल्ली सरकारच्या कायदा मंत्रालयाकडे पाठवली जाईल. त्यानंतर त्या मीडिया हाऊसविरोधात दिल्ली सरकारकडून अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला जाईल, अशी सूचना केजरीवाल यांनी आपल्या मंत्र्यांना केली आहे. त्याबाबतचं पत्रक CNN IBNच्या हाती लागलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी अब्रुनुकसान कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. आणि आता तेच अब्रुनुकसानीच्या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, आम्ही नवीन काहीही केलेलं नाही, आम्ही जुन्याच नियमांचा पुनरुच्चार करतोय, असं स्पष्टीकरण आम आदमी पक्षानं दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2015 08:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close