S M L

'जय'ललितांना मोठा दिलासा; सर्व आरोपांतून मुक्त

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2015 01:53 PM IST

'जय'ललितांना मोठा दिलासा; सर्व आरोपांतून मुक्त

11  मे : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तामिळनाडूच्या माजी मुख्यंमत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टाने आज मोठा दिलासा दिला. कोर्टाने जयललितांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. निकाल जाहीर होताच कोर्टाच्या आवारासह तामिळनाडूत अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात येत आहे.

बंगळूरूच्या विशेष न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी जयललिता यांना 4 वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला होता. याविरोधात जयललितांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली होती. गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याची आज अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने आज जयललिता यांना मोठा दिलासा देत त्यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

निकाल जाहीर होताच कोर्टाच्या आवारात उपस्थित असलेल्या अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. तामिळनाडूत तर कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे जयललिता यांचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2015 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close