S M L

मनसेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता

28 ऑक्टोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. मनसेनेची स्थापना झाल्यानंतर साडेतीन वर्षातच त्यांना हा दर्जा मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तेरा आमदार निवडून आले होते. तसेच पक्षाला 23 टक्के मतंही मिळाली होती. त्याआधी त्यांना सुप्रीम कोर्टाने रेल्वे इंजीन हि निशाणी दिली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजीन या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर राज्यात निवडणुका लढवू शकते. मुबई महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2009 12:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2009 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close