S M L

भूकंपाच्या हादर्‍यात बिहारमध्ये 16 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: May 12, 2015 11:30 PM IST

भूकंपाच्या हादर्‍यात बिहारमध्ये 16 जणांचा मृत्यू

12 मे : एका मोठ्या भूकंपानंतर तब्बल दोन आठवड्यांनी नेपाळ पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं हादरलंय. भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतात आसाम, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. तर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशाही काही ठिकाणी धक्के जाणवले. या भूकंपात बिहारमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. छपरा जिल्ह्यात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक ठिकाणी इमारतींना तडे गेले. पश्चिम बंगालमध्येही जवळपास दहा जण जखमी झालेत.

नेपाळमध्ये आज दुपारी 12.35 वाजता आलेल्या या भूकंपात नेपाळमध्ये 68 जणांचा मृत्यू झालाय. तर एक हजारांहून जास्त जण जखमी झालेत. नेपाळला भूकंपाचे जवळपास 7 धक्के जाणवले. काठमांडूजवळ असलेल्या कोदरीजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर रिश्टर स्केलवर 5 ते 6 तीव्रतेचे जवळपास 6 धक्के नेपाळमध्ये जाणवले. या भूकंपामुळे नेपाळमधल्या सिंधूपलक चौक परिसरात दरडीही कोसळल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2015 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close