S M L

...जर भूकंप आला तर हे करा, हे करू नका !

Sachin Salve | Updated On: May 12, 2015 06:35 PM IST

...जर भूकंप आला तर हे करा, हे करू नका !

12 मे : निसर्गापुढे कुणाचं काही चालत नाही...भूकंपासारखं संकट काही क्षणात होत्याचं नव्हतं करून जातं. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा बळी गेला. आज पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला. भारताच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाने सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. तसंच जर भूकंप आला तर काय करावं काय करू नये यासाठी काही सुचना केल्या आहेत.

1) तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल तर एखाद्या मजबूत टेबल, बेड खाली आसरा घ्यावा.

जर टेबल नसेल तर आपला चेहरा आणि डोकं हाताने झाकून घ्यावं आणि इमारतीच्या कोपर्‍यात गुडघ्यावर बसावं.

2) जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर झाड, वीज खांब, तारापासून दूर राहावं.

3) इमारतीतून बाहेर पडत असताना लिफ्टचा उपयोग टाळावा, पायर्‍याचा वापर करावा.

4) जर तुम्ही कार चालवत असाल तर शक्य तितक्या लवकर कार थांबवावी आणि कारमध्येच बसून राहावं

5) आपली कार उड्डाणपूल, ब्रीज, इमारतीच्या बाजूला उभी करू नये.

6) आपण जर ढिगाराखाली दबले गेला असला तर माचिस, लायटर पेटवू नये.तसंच कोणतीही वस्तू हटवण्याचा प्रयत्न करू नये.

7) ढिगाराखाली अडकल्यावर एखाद्या पाईप अथवा भिंतीवर थाप मारत राहावी, जेणे करून बचावपथकाला तुमचं ठिकाण कळू शकेल.

जर तुमच्याकडे शिट्टी असेल तर ती वाजवावी. जर कोणताही पर्याय नसेल तर जोरात मदतीसाठी हाक मारावी.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2015 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close