S M L

पंतप्रधानांचा सेना खासदारांना सल्ला, 'विकासाला विरोध करू नका' !

Sachin Salve | Updated On: May 13, 2015 08:41 PM IST

sena on modi13 मे : जैतापूर प्रकल्पाचा विरोध नोंदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजुतीचा सल्ला दिला. विकासाला विरोध करू नका, अशा प्रकल्पांमधून मोठी गुंतवणूक होत असते हे लक्षात घ्या असा सल्ला पंतप्रधानांनी शिवसेनेच्या खासदारांना दिलाय. तसंच मी काही संशोधक नाही, तुमचे आक्षेप मी संशोधक मंडळाला पाठवतो असंही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना बजावलं.

शिवसेना एनडीएचा घटक पक्ष जरी असला तरी या ना त्या कारणावरून सेना आपला विरोध दर्शवते. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेनं कडाडून विरोध केलाय. आज (बुधवारी) सेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. जैतापूर प्रकल्पाच्या मुद्द्यावर गेल्या 13 दिवसांपासून शिवसेनेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागत होते. पण, भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून टाळाटाळ होत होती. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संतापले आणि त्यांनी पंतप्रधान कार्यालयासमोर बसूनच आंदोलन करू, असा इशारा दिला. अखेर संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर शिवसेना खासदारांना दुपारी 3:30 ची वेळ मिळालीये.

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून तो पंतप्रधानांच्या कानावर घालणार असं सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार त्यांनी पंतप्रधानांकडे तसा प्रस्तावही मांडला. पण, सेनेच्या या भूमिकेमुळे पंतप्रधांनानी सेनेच्या खासदारांनी खडेबोल सुनावले. विकासाला विरोध करू नका.अशा प्रकल्पांमधून मोठी गुंतवणूक होत असते. हे लक्षात घ्या, फक्त विभागाचा विकास होतो असं नाही. असं सांगत त्यांनी उदाहरण म्हणून गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातल्या अका प्रकल्पाचा दाखला दिला. अका प्रकल्पाला स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे तो प्रकल्प मेहसाणा शहरात हलवावा लागला, नंतर त्याच प्रकल्पामुळे मेहसाणा शहराची भरभराट झाली अशा शब्दात पंतप्रधानांनी सेना खासदारांची कानउघडणी केली. तसंच जैतापूर प्रकल्प विनाशकारी आहे की नाही हे सांगण्यासाठी मी काही संशोधक नाही अशा शब्दात बजावत तुमचे आक्षेप मी संशोधक मंडळाला पाठवतो, असंही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2015 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close