S M L

तेलंगणात राहुल गांधींची किसान पदयात्रा सुरू

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2015 02:25 PM IST

तेलंगणात राहुल गांधींची किसान पदयात्रा सुरू

15 मे : शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात रान उठवण्याचा प्रयत्न करणार राहुल गांधी आता दोन दिवसांच्या तेलंगणाच्या दौर्‍यावर जात आहेत. राहुल गांधी आज (शुक्रवारी) तेलंगणात 15 किलोमीटरच्या किसान पद यात्रा काढणार आहे.

तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातून ही पदयात्रा निघेल. 15 किलोमीटरची ही पदयात्रा झाल्यानंतर राहुल गांधी संध्याकाळी शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न कराणार आहे.

राहुल गांधींनी याआधी पंजाब आणि विदर्भातही शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी पदयात्रा केल्या होत्या. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांनाही राहुल गांधींनी भेट दिली होती. त्यामुळे राहुल गांधी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर प्रचंड सक्रीय झालेले दिसत आहेत.

तेलंगणात सध्या टीआरएसचं सरकार आहे. गेल्यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी इथे आत्महत्या केल्या. या पदयात्रेच्या मध्यमातून राहुल गांधींची तेलंगणातील शेतकर्‍यांमध्ये एकप्रकारचा विश्वास निर्माण करतील असं मत तेलंगणातील काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2015 08:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close