S M L

पुन्हा दरवाढीचा भडका ; पेट्रोल 3.13 तर डिझेल 2.71 रूपयांनी महागलं

Sachin Salve | Updated On: May 15, 2015 11:03 PM IST

petrol_3415 मे : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेचा आता आणखी महागाईचे चटके बसणार आहे. पेट्रोलच्या दरात 3.13 तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ करण्यात आलीये. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 15 दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती आता पुन्हा एकदा दरवाढीचा पेट्रोलबॉम्ब पडलाय.

काही महिन्यांपूर्वी आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमतीत कपात होत होती. त्यामुळे याचे परिणाम भारतातही जाणवले. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची कपात करण्यात आली होती. मात्र, आता ही कपात भरून काढली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोलच्या दरात 3 रुपये 18 पैशांने वाढ करण्यात आली होती. तर डिझेलच्या दरातही 3 रुपये 9 महागले होते. एप्रिलमहिन्याच्या सुरुवातील पेट्रोल 49 तर डिझेल 1 रुपयांने स्वस्त करून जनतेला दिलासा देण्यात आला. पण, हा दिलासा महिन्याच्या अखेरीस हिरावून घेण्यात आला. मागील महिन्यात 30 एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये 96 तर डिझेलच्या दरात 2 रुपये 37 पैशांने महागलं होतं. ही दरवाढ सोसून 15 दिवस उलटत नाही तेच पुन्हा एकदा दरवाढीनं डोकंवर काढलंय.पेट्रोल 3.13 तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ करण्यात आलीये. गेल्या दोन महिन्यात करण्यात आलेली कपात या दरवाढीतून भरून काढली जात असल्याचं दिसून येतंय.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

मुंबईत 70 रुपये 65 पैसे प्रति लीटर दराने मिळणारं पेट्रोल आता 73 रुपये 78 पैसे प्रति लीटरच्या दराने मिळणाराय

तर डिझेल 59 रुपये 34 पैसे या दराने मिळेल.

- नागपूरमध्ये पेट्रोल आता 76 रुपये, डिझेल 59 रुपयांनी मिळणार

- नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 72 रुपये 66 पैसे लीटर तर डिझेलचे दर 58 रुपये 32 पैसे लीटर झालंय.

- औरंगाबादमध्ये पेट्रोलचे दर 74 रुपये 41पैसे तर डिझेल 61 रुपये 05 पैसे लीटर झालेत.

- पुण्यात पेट्रोल आता 74 रुपये 43 पैसे लीटर तर डिझेल 59 रुपये 56 पैसे लीटरने मिळेल. 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2015 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close