S M L

4 दिवस आधीच मान्सून अंदमानात

Samruddha Bhambure | Updated On: May 17, 2015 03:47 PM IST

4 दिवस आधीच मान्सून अंदमानात

17 मे : अंदमान निकोबार बेटावर मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचे वेळेआधी आगमन काहीसं दिलासादायक ठरणार आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी 20 मेला मान्सून अंदमानात दाखल होतो. गेल्या वर्षी मान्सून 18 मे रोजी दाखल झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून अंदमान-निकोबार बेटावर जोरदार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर अंदमानात मान्सून सक्रिय झाल्याचे भारतीय हवामान विभागाच्या वतीने आज जाहीर करण्यात आले.

अंदमानसह उत्तर अंदमान समुद्र तसंच बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय झाल्याचंही हवामान विभागाने जाहीर केलं आहे. केरळात मान्सून 30 मेच्या आसपास दाखल होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे त्याची पुढची वाटचाल कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2015 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close