S M L

राहुल गांधी आजपासून अमेठी दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2015 04:28 PM IST

राहुल गांधी आजपासून अमेठी दौर्‍यावर

18 मे : आधी पंजाब, विदर्भ आणि तेलंगणातील शेतकर्‍यांसोबत संवाद साधल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या अमेठी दौर्‍यावर असणार आहेत. अवकाळीग्रस्त शेतकऱयांच्या समस्या जाणून घेण्याबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचीही ते भेट घेणार आहेत. तसंच अमेठीत ज्या ठिकाणी फूड पार्क बनवलं जाणार होतं त्या जागेलाही राहुल गांधी भेट देणार आहेत.

दोन महिन्यांच्या चिंतन सुटीवरून मायदेशी परतलेले राहुल गांधी राजकारणात कमालीचे आक्रमक झाले आहेत. अमेठी फूड पार्क रद्द होण्याच्या कारणावरुन राहुल गांधी लोकसभेत चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले होते. फूड पार्क रद्द होण्यापाठीमागे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याचसोबत एनडीए सरकार सुडाचं राजकारणं करत असल्याचा आरोपही राहुल गांधीनी केला होता. या सर्व आरोप-प्रत्यारोपांनतर राहुल आज पहिल्यांदाच अमेठीला भेट देणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2015 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close