S M L

पंतप्रधानांना शेतकर्‍यांना भेटण्यासाठी वेळ नाही - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2015 04:28 PM IST

पंतप्रधानांना शेतकर्‍यांना भेटण्यासाठी वेळ नाही - राहुल गांधी

18 मे : मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकर्‍यांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा असा सल्ला राहुल यांनी यावेळी केंद्रला दिला.

त्याचबरोबर, परदेश दौरे करणार्‍या पंतप्रधान मोदींना देशातील शेतकर्‍यांना भेटण्यासाठी वेळ नाही. पंतप्रधानांनी अद्याप एकाही शेतकरी कुटुंबाची भेट घेतली नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल सध्या अमेठी या आपल्या मतदार संघात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांची भेट घेत आहेत. 'सतत परदेश दौर्‍यावर असलेले पंतप्रधान मोदी देशातील शेतकर्‍यांच्या घरी कधी आले नाहीत. मोदी सरकारने शेतकर्‍यांकडून फूड पार्क हिसकावून घेतल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.

तसंच, फूड पार्कला विरोध करून भाजप माझ्याशी सूडाचे राजकारण करू पाहत आहे पण, याचा फटका शेतकर्‍यांना बसत असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. अमेठीमध्ये फूड पार्क झाल्यास अमेठीबरोबरच आसपासच्या 10 जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही याचा फायदा होणार होता, असं ते म्हणाले.

देशातील शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांना हाताळण्यास एनडीए पूर्णपणे अपयशी ठरत असल्याने या सरकारला दहा पैकी शून्य गुण देऊ, असं ही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2015 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close