S M L

दाऊद इब्राहिम इस्लामाबादमध्ये?

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2015 10:12 PM IST

Image img_232822_daud3534_240x180.jpg19 मे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी दाऊद इब्राहिमचं लोकेशन ट्रॅक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दाऊद इब्राहिमचा आपल्या कुटुंबासह सध्या इस्लामाबादमध्ये राहतो. इस्लामाबादपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोयुभान हिल, मुरी रोड इथल्या सुरक्षित घरात राहतो. त्याला आयएसआयनं सुरक्षा पुरवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे. तसचं दाऊदचे कराची आणि इस्लामाबादमध्येही बंगले असल्याचं सूत्रांकडून कळतयं. ही सर्व घरं आयएसआयनं पुरवली असून दाऊदकडे तीन देशांचे पासपोर्टही आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2015 10:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close