S M L

दाऊद सापडला !; हा घ्या पत्ता...भोयुभान हिल, इस्लामाबाद ?

Sachin Salve | Updated On: May 20, 2015 12:02 PM IST

Dawood Ibrahim12320 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा अखेर सापडला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दाऊद इस्लामाबादजवळच्या भोयुभान हिल, मुरी रोड इथल्या एका सुरक्षित घरात आपल्या कुटुंबासोबत राहतोय. हे घर इस्लामाबादपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. दाऊदला आयएसआयनं सुरक्षा पुरवली आहे.

दाऊदची कराची आणि इस्लामाबादमध्ये इतर घरंही आहेत. ही सर्व घरं आयएसआयनं पुरवली आहेत. दाऊदकडे तीन पासपोर्ट आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. दाऊद कराचीत दोन आणि इस्लामाबाद इथल्या दोन घरांचा पत्ता वापरत असतो. सध्या दाऊद इस्लामाबादजवळ भोयुभान हिल, मुरी रोड इथं राहतोय असा दावा गुप्तचर संस्थेनं केलाय. विशेष म्हणजे, दाऊद कुठे आहे आम्हाला माहिती नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी संसदेत केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी दाऊदचा ठावठिकाणा आम्हाला माहिती असून तो पाकिस्तानातच लपलाय असं निवेदन सादर केलं. राजनाथ सिंह यांनी खुलासा केल्यानंतर आता दाऊदचा पूर्ण पत्ताचा गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागलाय. पण, पुढे काय असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झालाय.

# दाऊदकडे असलेले पासपोर्ट

जी - 866537

सी - 267185

केसी - 285901

# दाऊद वापरत असलेले पत्ते

मोईन पॅलेस

दुसरा मजला, अब्दुल्ला शहा गाझी रोडच्या समोर

क्लिफ्टन, कराची

6/A खट्टबन तनझीम, फेज-5

डिफेंस हाऊसिंग एरीया, कराची

मार्गालीय रोड,

पी-6/2, स्ट्रिट नं. 22, हाऊस नं. 29 इस्लामाबाद

# संपूर्ण कुटुंबाकडे पाकिस्तानी पासपोर्ट

- महाजबीन (पत्नी)

- महरूख (मुलगी)

- मेहरून (मुलगी)

- मोईन (मुलगा)

- अनिस (भाऊ)

- मुश्ताक (भाऊ)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2015 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close