S M L

'सोने पे सुहागा', बँकेत सोनं ठेवून कमवा करमुक्त व्याज ?

Sachin Salve | Updated On: May 20, 2015 02:53 PM IST

'सोने पे सुहागा', बँकेत सोनं ठेवून कमवा करमुक्त व्याज ?

gold yojana20 मे : आतापर्यंत तुम्ही सोनं तारण ठेवून कर्ज मिळवू शकत होता पण, आता तुम्ही सोनं बँकेत ठेवून करमुक्त व्याज मिळवू शकता. केंद्र सरकारने सुवर्ण ठेव योजना अशी ही योजना तयार केली आहे. त्यामुळे 'सोने पे सुहागा' अशी संधी चालून आलीये.

विविध संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि मंदिर समित्या यांच्याकडे असलेल्या सोन्याचा वापर विकासासाठी करता यावा यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखलेली आहे. सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत कोणीही आपल्याजवळील सोनं बँकेत जमा करुन त्यावर व्याज मिळवू शकतात आणि हे व्याज करमुक्त असणार आहे. यासाठी बँकेत किमान 30 ग्रॅम सोनं किमान एक वर्षासाठी ठेवावं लागणार आहे.

या योजनेमुळे ग्राहक, बँका दोघांचाही फायदा होईल आणि त्याचबरोबरीने आर्थिक विकासाला हातभार लागू शकेल. सध्या आपल्या देशात एक हजार टन सोन्याची आयात होते आणि देशभरात वीस हजार टन सोनं पडून आहे. हे सोनं जर अशा योजनेच्या माध्यमातून बँकाकडे आलं तर सोन्याची आयात कमी व्हायला मदत होईल आणि ग्राहकांना व्याजातून करमुक्त कमाई होणार असल्यामुळे त्यांचाही फायदा होणार आहे. या सोन्यात दागिन्यांचा समावेश नसेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2015 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close