S M L

उत्तर प्रदेशात लवकरच येणार मॅगीवर बंदी?

Samruddha Bhambure | Updated On: May 20, 2015 06:08 PM IST

उत्तर प्रदेशात लवकरच येणार मॅगीवर बंदी?

20 मे : कुठेही आणि कधीही भूक लागली की अगदी दोन मिनिटांत होणारा पदार्थ म्हणजे मॅगी. पण आता या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या चवीने वेड लावणार्‍या मॅगीचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशचं अन्न आणि औषध प्रशासन लवकरच मॅगीचं उत्पादन करणार्‍या नेस्ले कंपनीवर कारवाईला सुरुवात करणार आहे. कोलकात्याच्या लॅबमध्ये मॅगीच्या सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली होती आणि यामध्ये MSG आणि लेडचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी पुढच्या तपासण्यांचे आदेश दिले आहेत.

यावर नेस्ले कंपनीने एका पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मॅगीचे उत्पादन करणार्‍या नेस्ले कंपनीने हे आरोप निराधार असल्याचा दावा करत आरोप फेटाळून लावले आहेत. मॅगी नूडल्सच्या पाकिटामध्ये MSGचं प्रमाण जास्त आढळल्याच्या बातम्यांची आम्हाला कल्पना आहे. याबाबत यंत्रणांचा पुढील तपास सुरू आहे. आम्हीही एका तटस्थ प्रयोगशाळेला आमच्या उत्पादनाची सॅम्पल्स चाचणीसाठी दिलेली आहे. आम्ही मॅगी नूडल्समध्ये MSG वापरत नाही आणि उत्पादनाच्या लेबलवर नियमांनुसारच सर्व माहिती दिली जाते, असं नेस्लेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2015 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close