S M L

वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र

Sachin Salve | Updated On: May 26, 2015 12:12 PM IST

वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र

27may_pm_modioffice26 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त देशवासियांना पत्र लिहून संवाद साधलाय. देशभरातल्या वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधानांचं हे पत्र देण्यात आलंय. या पत्रात मोदी म्हणतात, गरीब माणूस हा सरकारच्या धोरणांचा केंद्र बिंदू आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या असून नुकसानभरपाईची रक्कम दीड पटीनं वाढवण्यात आली आहे असा दावा केलाय.

तसंच या आधी मनमानी पद्धतीनं होत असलेलं कोळसा खाणींचं वाटप बंद करून सरकारनं त्यांचा लिलाव केला. कोळसा खाणांच्या लिलावातून अंदाजे तीन लाख कोटी तर स्पेक्ट्रम लिलावातून एक लाख कोटी मिळाले असंही पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. देशाचा विकासदर वाढला असून सरकारच्या प्रयत्नांनी तुमच्या जीवनाला स्पर्श झाला आहे. विकासाची ही फक्त पायाभरणी आणि सुरूवात आहे असंही पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2015 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close