S M L

सुर्य कोपला, देशभरात उष्माघाताचे 1400 बळी

Sachin Salve | Updated On: May 28, 2015 03:52 PM IST

सुर्य कोपला, देशभरात उष्माघाताचे 1400 बळी

28 मे : मे महिन्याच्या अखेरीस सुर्यदेवांची  रौद्ररूप धारण केल्यामुळे देशभरात उष्णतेची लाट आलीये. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 1400 लोकांचा बळी गेलाय. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघातामुळे मृतांची संख्या 1 हजार 360 वर पोहचलीये. एकट्या आंध्र प्रदेशात 1 हजार 20 बळी गेलेत, तर तेलंगणात 340 बळी गेलेत. ओडिशामध्ये आतापर्यंत उष्माघाताचे 60 बळी गेले आहे. तितलागडमध्ये आतापर्यंतचं उच्चांकी तापमान 47.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. ओडिशामधलं तापमान येत्या दोन ते तीन दिवसांत कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर दिल्लीतही अति उष्णतेनं दोन जणांचा मृत्यू झालाय. आग्रामध्ये 46 अंश इतकं तापमान नोंदवलं गेलंय. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्येही उष्णतेची लाट कायम आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2015 01:24 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close