S M L

मोदींचे कट्टर विरोधक संजय जोशींची 'घरवापसी' ?

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 02:24 PM IST

मोदींचे कट्टर विरोधक संजय जोशींची 'घरवापसी' ?

29 मे : भाजप नेते आणि कट्टर मोदी विरोधक संजय जोशी पुन्हा भाजपमध्ये सक्रीय होण्याची चर्चा रंगलीये. संजय जोशींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतलीये. संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात (गुरुवारी) ही भेट झालीये. नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक असलेले संजय जोशी भाजपमध्ये पुन्हा सक्रिय होणार अशी माहिती सूत्रांनी दिलीये. संजय जोशींना पक्षात महत्त्वाचं पद देणार असल्याचंही समजतंय.

काही दिवसांपूर्वीच संजय जोशींनी मोदी आपले नेते असल्याचं विधान केलं होतं. यापूर्वी नरेंद्र मोंदींेच्या दबावामुळेच संजय जोशी यांना भाजप राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यावा लागला होता अशी चर्चा होती. संजय जोशी खरे कार्यकर्त आहेत. भागवतांच्या भेटीत जोशींनी आपल्या मनातील काही अडचणी सांगितल्या असतील. संजय जोशी यांना पुन्हा भाजपमध्ये जबाबदारी दिल्यास भाजपला फ़ायदा होईल असं मत मा गो वैद्य यांनी व्यक्त केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close