S M L

देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे बळींची 1 हजार 826 वर

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 03:45 PM IST

देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे बळींची 1 हजार 826 वर

29 मे : आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बळींची संख्या पोचली 1 हजार 826 वर पोहचलाय. दोन्ही राज्यांमधलं तापमान 47 अंशांवर आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताने जवळपास 1700 लोकांचा मृत्यू झालाय. तर ओडिशामध्ये 89 आणि गुजरामध्येही 7 जणांचा उष्माघातानं बळी गेलाय. ओडिशामधल्या कलांगडी जिल्ह्यात राज्यातल्या सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झालीय.

उस्मानाबादेत दोघांचा मृत्यू

तर राज्यातही उष्णतेचा पारा वाढलेलाच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झालाय. मेंडसींगा गावातल्या एका वृद्धाचा भाजीमंडईत मृत्यू झाला. तर उस्मानाबाद शहरात एका मजुराचा झाडं तोडताना उष्माघातानं मृत्यू झालाय.

चंद्रपुरात पारा 47 वर

वाढत्या तापमानाचा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जनजीवनावर परिणाम झालाय. चंद्रपुरात पारा 47 अंशांवर पोहोचलाय.सकाळी दहा नंतर संध्याकाळपर्यंत रस्ते ओस पडतायेत. उन्हाच्या वाढत्या काहिलीने लोकांना ञस्त करुन सोडलंय्. सकाळी दहानंतर वाढलेला तापमानामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत उष्णतेच्या वार्‍याच्या झळा कायम राहत असल्याने गेल्या दहा दिवसांत परिस्थिती गंभीर झाली आहे तर शेवटच्या टप्प्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

परभणीत उकाडा

परभणी जिल्ह्याचे तापमान 15 दिवसांपासून 46 अंशापर्यंत पोहचले असल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर उकाडा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्हावासी अक्षरशः हैराण झाले आहे. तर ही उष्णता येणार्‍या मॉन्सूनसाठी आवश्यक असल्याचे मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close