S M L

मराठी माणसावर टीका केलीच नाही : बाळासाहेबांचा खुलासा

6 नोव्हेंबर मराठी माणसानं शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला या सामनामधल्या अग्रलेखातील वाक्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इन्कार केला आहे. त्यामुळे पराभवानंतर शिवसेनेनं मराठी माणसावर केलेल्या टीकेनंतर खुद्द शिवसेनाप्रमुखांनी सारवासारव केल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन समजतं. गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये येऊन आमदारांना पराभवाचं दु:ख विसरुन कामाला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेनं अनेक परभव पचवले असं सांगत त्यांनी शिवसैनिकांना उत्साहानं कामाला लागण्याचे आदेश दिले. पण आमदारांना मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुखांनी नव्या वादाला तोंड फोडलं. मराठी माणसानं शिवसेनेच्या पाठित खंझीर खुपसल्याचं 24 ऑक्टोबरला सामनामधल्या अग्रलेखात लिहीलं होतं. मात्र मी असं कधीच लिहीलं नव्हतं असा दावा बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. एकंदरीतच सामनामध्ये छापून आलेल्या वक्तव्याचाच बाळासाहेबांनी इन्कार केल्यानं आता सामनामधले अग्रलेख नेमकं कोण लिहीतं अशी चर्चा सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2009 09:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2009 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close