S M L

'सुटकेस' सरकारपेक्षा 'सुटाबूटा'तले सरकार चांगले -मोदी

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 01:45 PM IST

rahul vs modi54q30 मे : सध्या मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चांगलंच शब्दयुद्ध रंगलंय. मोदी सरकार हे सुटाबूटातलं सरकार आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर मोदींनीही त्यांना प्रत्यूत्तर दिलं होतं. सुटाबूटातले सरकार हे सुटकेस सरकारपेक्षा अधिक चांगले आहे असा टोला मोदींनी राहुल यांना लगावला.

मात्र आता पुन्हा राहुल गांधींनी ट्विटरद्वारे टीका केलीये. केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाबाबतच्या भूमिकेवरून त्यांनी मोदींवर ट्विट केलंय. मोदीजींना गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावण्याची खूप घाई झालीये. शेतकरी विरोधी भूसंपादनाचे विधेयक तिसर्‍यांदा रेटण्याचा प्रयत्न करतंय असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांच्या आणि गरीब मजूरांसाठी लढा कायम चालू ठेवणार असल्याचा निर्धारही राहुल गांधींनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2015 08:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close