S M L

खिश्याला कात्री, आजपासून 14 टक्के सेवा कर लागू

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 02:43 PM IST

खिश्याला कात्री, आजपासून 14 टक्के सेवा कर लागू

01 जून : महागाईने अगोदरच कंबरडं मोडलं आता त्यातच खिश्याला आणखी कात्री बसणार आहे. आज 1 जूनपासून सेवा कर (सर्व्हिस टॅक्स)मध्ये वाढ करण्यात आलीये. आता सेवा कर 12 टक्क्यांवरून 14 टक्के मोजावा लागणार आहे. त्यामुळे अनेक सेवा महागणार आहेत. त्यामुळे रेल्वे, विमान, हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवण, फोन बिलसाठी आपल्याला आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात टॅक्स जैसे थे ठेवून सेवा करात वाढ करण्यात आलीये. आजपासून याची अंमलबजावणी करण्यात आलीये.

आजपासून हे महाग

- रेल्वे एसी तिकीट

- विमान प्रवास

- हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण

- टेलिफोन आणि मोबाईल बिल

- मालमत्ता खरेदी

- पीएफमधून पैसे काढणं

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close