S M L

गुजरातमध्ये गायकावर तब्बल साडेचार कोटी उधळले

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 05:18 PM IST

गुजरातमध्ये गायकावर तब्बल साडेचार कोटी उधळले

gujrat singer34501 जून : एखाद्या कार्यक्रमात फर्माईश करणं आणि गाणं आवडल्यावर बक्षीस म्हणून पैसे देणं आपण अनेकदा बघतो....गुजरातमधल्या जामनगर जिल्ह्यातल्या कालावाडमध्ये एका कार्यक्रमात कलाकारावर लोकांनी तब्बल साडेचार कोटींची उधळण केलीय.

प्रसिद्ध गायक किर्तीदान गढवी यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात लोकांनी ही पैशांची उधळण केली.

किर्तीदान गात असताना लोक स्टेजवर आले आणि त्यांनी पैशाचा अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला. दहा रूपयांच्या नोटांपासून ते हजार रूपयांच्या नोटांपर्यंतच्या नव्या कोर्‍या नोटांची ही उधळण होती. पैश्यांच्या या ओंगळवाण्या प्रदर्शनाबद्दल आयोजकांवर चौफेर टीका होतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close