S M L

राहुल गांधी मध्यप्रदेशात महूच्या दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2015 01:26 PM IST

राहुल गांधी मध्यप्रदेशात महूच्या दौर्‍यावर

rahul gandhi3402 जून : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज (मंगळवारी) मध्य प्रदेशातल्या महूच्या दौर्‍यावर जाणार आहेत. महू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव आहे. पुढच्या वर्षी डॉ.आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यजयंती आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे वर्षभर निरनिराळे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दलितांनी काँग्रेसची साथ सोडली होती. काँग्रेसच्या पराभवाचं हे एक मोठं कारण मानलं जातंय. त्यामुळेच पुन्हा एकदा दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. राहुल गांधी आज दुपारी बारा वाजता इंदूरला पोहोचले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांनी दौर्‍याला सुरुवात केलीये.

त्यानंतर ते इंदूरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या महूमध्ये दुपारी 1च्या सुमाराला पोहोचतील. दुपारी राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. त्यानंतर संध्याकाळी ते दलित नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र, राहुल यांची ही भेट म्हणजे दलितांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपतर्फे करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2015 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close