S M L

दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी विधेयक आणा, सोनियांचं पंतप्रधानांना पत्र

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2015 02:06 PM IST

32sonia_on_modi02 जून : महाराष्ट्र आणि राजस्थानात दलितांवर होणार्‍या वाढत्या अत्याचारांची दखल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलीये. सोनिया गांधी यांनी त्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय.

दलितांवरचे अत्याचार असे प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं पावसाळी अधिवेशनात विधेयक आणावं अशी मागणी सोनिया यांनी या पत्रामधून केलीये.

तसंच यूपीए सरकारनं यासंबंधी काढलेल्या वटहुकूमाचं कायद्यात रुपांतर करण्यास सध्याचं केंद्र सरकार अपयशी ठरल्याबद्दल नाराजीही व्यक्त केलीये. विशेष म्हणजे या पत्रांमध्ये सोनिया गांधी यांनी भाजपची सत्ता असलेल्या 2 राज्यांमधल्या काही घटनांचा उल्लेख केलाय. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या सागर शेजवळ खून प्रकरणाचाही समावेश आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2015 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close