S M L

वादात अडकलेली 'मॅगी' देशभरातून हटवण्याचा नेस्लेचा निर्णय

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2015 09:49 AM IST

वादात अडकलेली 'मॅगी' देशभरातून हटवण्याचा नेस्लेचा निर्णय

05 जून : मॅगी नूडल्समध्ये हानिकारक घटक असल्याच्या आरोपानंतर अनेक राज्यांनी मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीने देशभरातून मॅगीचा स्टॉक परत मागवण्याचा निर्णय घेतला. पण मॅगी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावाही यावेळी नेस्ले कंपनीकडून करण्यात आला आहे.

मॅगीत हानिकाराक घटक असल्याचे आरोप झाल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे नेस्ले कंपनीने देशभरातून मॅगीचा स्टॉक हटवण्याचा निर्णय घेतला. पण, मॅगीच्या दर्जाबाबत योग्य माहिती समोर आल्यानंतर मॅगी पुन्हा बाजारात आणण्यात येईल, असंही नेस्लेच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

गुरूवारी रात्री उशीरा नेस्ले कंपनीने हा निर्णय घेतला. मॅगीमध्ये हानिकारक घटक आढळून आल्यानंतर केरळा, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनी मॅगीच्या विक्रीवर तात्पूरती बंदी घातली. तर आज महाराष्ट्रात पुणे विभागात पाठवलेल्या मॅगीच्या सॅम्पलचा अहवाल येणार आहे. त्यानंतर बंदीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, आज दुपारी 12 वाजता नेस्लेची पत्रकार परिषद होणार असून, यावेळी मॅगीच्या विक्रीबाबतचा महत्त्वाचा निर्णय कंपनीकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close