S M L

भिंद्रनवालेच्या पोस्टरवरून जम्मू-काश्मीरमध्ये तणाव, 1 जण ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2015 01:31 PM IST

भिंद्रनवालेच्या पोस्टरवरून जम्मू-काश्मीरमध्ये तणाव, 1 जण ठार

05 जून : खलिस्तानी अतिरेकी जनरल सिंह भिंद्रनवाले याच्या पोस्टरवरुन काश्मीरमध्ये वाद निर्माण झाला आहे. यावेळी शीख युवक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 1 जण ठार झालाय, तर सातजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी लावलेलं पोस्टर हलवण्याचा प्रयत्न केला असता शीख युवकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस आणि शीख यांच्या झटापट झाली. त्यातून ही घटना घडली आहे.

सध्या सतवारी, राणीबाग, चट्टा आणि गदीगढ मिरानसाहिब या हिंसा होत असलेल्या जागी कर्फ्यु लावण्यात आला आहे. सतवारी भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. या झटापटीत एका युवकाचा मृत्यू झाला आणि सातजण जखमी झाले.

जम्मू क्षेत्रातील बर्‍याच जिल्ह्यात शाळा, कॉलेज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणं परिस्थिती तणावपूर्ण होती, जम्मूच्या काही भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसंच काही युवकांना अटक करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close