S M L

ज्येष्ठ लेखिका सुनीता देशपांडे यांचं निधन

8 नोव्हेंबर ज्येष्ठ लेखिका आणि पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांचं दीर्घ आजाराने पुण्यात निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर साहित्य तसंच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सुनीता देशपांडे यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुठलेही धार्मिक संस्कार न करता साधेपणाने अंत्यसंस्कार करावे अशी सुनीताबाईंची इच्छा होती त्यानुसारच अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनीताबाईंचा जन्म 1926 सालचा. एक लेखिका म्हणून त्यांची मराठी साहित्यात एक वेगळी ओळख होती. त्यांनी लिहिलेलं 'आहे मनोहर तरी' या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. या पुस्तकाचं गुजराती-इंग्रजी भाषेत भाषांतरही झालं. प्रिय जी.ए., मण्यांची माळ, मनातलं अवकाश, सोयरे सकळ ही त्यंाची इतर पुस्तकंही वाचकांच्या तितकीच पसंतीला उतरली. पु.लं.ची सहप्रवासी आणि समीक्षक ही भूमिका निभावताना त्यांनी स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2009 06:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2009 06:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close