S M L

नेस्लेचे अधिकारी सरसावले, मॅगी खाण्यासाठी चांगलीच !

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2015 05:37 PM IST

नेस्लेचे अधिकारी सरसावले, मॅगी खाण्यासाठी चांगलीच !

05 जून : मॅगी न्यूडल्स खाण्यासाठी सुरक्षित आहे असं नेसलेचे आंतराष्ट्रीय सीईओ पॉल बल्क यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट यांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आल्यावर विविध राज्यांनी मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. या पार्श्वभूमी पॉल बल्क यांनी लोकांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण असल्यामुळे कंपनीने देशभरातून मॅगी परत मागवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम कंपनी करेल आणि लवकरात लवकर मॅगी पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशभरातून मॅगी न्यूडल्स परत घेण्याचा निर्णय गुरुवारीच कंपनीने घेतला आहे.

देशात विविध ठिकाणी मॅगीच्या उत्पादनांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून अधिकृतपणे पहिल्यांदाच त्यांची भूमिका मांडण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close