S M L

मॅगीनंतर आता सेरेलॅकवरही बंदीचा सरकारचा विचार !

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2015 08:48 PM IST

मॅगीनंतर आता सेरेलॅकवरही बंदीचा सरकारचा विचार !

cerlac05 जून : नेस्लेच्या मॅगी नूडल्सच्या प्रकरणानंतर आता केंद्र सरकार इतर पदार्थांबद्दलही सतर्क झाल्याचं दिसतंय. मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांच्या व्यतिरिक्त इतर उत्पादनं विकू न देण्याचा सरकारचा मानस आहे.

 लहानग्यांसाठी असलेल्या सेरेलॅकवर मेडिकल स्टोअरमध्ये विकण्यावर बंदी आणण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत केंद्रीय खतं आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी संकेत दिले आहे.

मेडिकल स्टोअर्समध्ये एखादी गोष्ट मिळतेय, म्हणजे ती प्रकृतीसाठी चांगलीच असणार किंवा त्यात औषधी गूण असणार, असा काही लोकांचा समज असतो. म्हणून यासाठी नवा कायदा आणण्याचा आम्ही विचार करतोय, असंही हंसराज अहिर यांनी सांगितलं.

मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण जास्त आढळल्यामुळे दिल्ली, बिहार, हरियाणा, केरळमध्ये बंदी घालण्यात आलीये. त्याचबरोबर लष्कराने मॅगीवर बंदी घातलीये. आता नेस्लेच्या इतर पदार्थही यामुळे अडचणीत आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 08:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close