S M L

झारखंड : पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2015 10:29 AM IST

झारखंड : पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार

09 जून : झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार झाले आहेत.

पलामू जिल्ह्यातील सतबरवा जंगलातल्या एका रस्त्यावरून माओवादी स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांनी या गाडीवर गोळीबार करत गाडीतल्या 12 माओवाद्यांना ठार मारलं. माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.

या माओवाद्यांकडून 8 रायफल्स आणि 220 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात शोधमोहिम करण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 08:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close